भिवापुर :-दिनांक ०५/०७/२०२४ ला फिर्यादी हे स्टॉफ सह नाइट गस्त पेट्रोलींग तसेच कोंबींग ऑपरेशन करीत असताना गोपनीय सुत्रधाराकडुन माहीती मिळाली की विनापरवाना रेती लोड करून टिप्पर भिवापुर रोडवरील शाहु धावा समोर उभा आहे. अशा मिळालेल्या विश्वसनीय खबर वरून स्टाफसह घटनास्थळी पोहोचले असता एक पिवळ्या रंगाचे ट्रक टिप्पर उभे दिसले टिप्पर क्र. एम एच ४०/ एके ५८५३ ची पाहणी केली असता सदर वाहनात आरोपी चालक नामे- १) राष्ट्रपाल राजकुमार बनकर वय ३३ वर्ष, रा. सुरगाव ता. उमरेड २) क्लीनर नामे सचिन चंद्रकाल खोब्रागडे वय ३२ वर्ष, रा. सुरगाव ता. उमरेड हे विनापरवाना अवैधरित्या रेती वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून १) एक पिवळया रंगाची टाटा कंपनीची १० चक्का टिप्पर वाहन क्र. एम एच ४०/एके ५८५३ किंमती २०,००,०००/- रू. २) ट्रक टिप्पर वाहन क्र. एम एच ४० एके ५८५३ मध्ये लोड असलेली अंदाजे ०.५ ब्रास रेती प्रत्येकी ब्रास ५००० रू. प्रमाणे एकूण २५०००/- रू. असा एकुण किंमती २०,२५,०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी चालक नामे- १) राष्ट्रपाल राजकुमार बनकर वय ३३ वर्ष, रा. सुरगाव ता. उमरेड २) क्लीनर नामे सचिन चंद्रकाल खोब्रागडे, वय ३२ वर्ष, रा. सुरगाव ता. उमरेड ३) मालक नामे पवन महाजन वय अंदाजे ३० वर्ष, रा. नागपुर यांचे विरूद्ध पोस्टे उमरेड येथे कलम ३०३(२), ३(५), ४९ भारतीय न्याय संहीता २०२३ सहकलम ४८ (७), ४८(८) महा. जमीन महसूल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमतेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी क्र. १) व २) यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे उमरेड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पाहवा आशिष खोडे, पोशि अमोल मांढरे, चालक सचिन यांनी पार पाडली.