प्रख्यात कलावंत पराग घोंगे आणि अनिल पालकरचा विशेष सत्कार
नागपूर :- आनंदयात्री,या फेसबुक समुहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेत विदर्भ विभागातून एकूण ७ एकांकिका सादर करण्यात आल्या. अप्रतिम सादरीकरण आणि उत्तम संहिताच्या जोरावर सुंदर नाट्य अविष्कार चे सादरीकरण हौशी नाट्य कलावंतांनी सादर केले. ज्यात भंडारा (पंख छाटले पतंगाचे), तुमसर (म्हाताऱ्याची व्यथा), बुलढाणा (नाटेवा न्नसंप आणि अनपेक्षित), वर्धा (निशाणी डावा आंगठा )आणि नागपूर (आणि हिटलर येतो व स्टॉप ) येथील हौशी कलावंतांनी आपली कला सादर केली . विदर्भात नाट्यक्षेत्रातील होतकरू हौशी कलावंत, दिग्दर्शक, लेखक ह्यांना आपली कला, प्रदर्शित करण्यास एक व्यासपीठ मिळावे तसेच विदर्भातील नाट्यचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विदर्भस्तरीय “आनंदयात्री एकांकिका स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या होत्या .
आनंदयात्री’ या फेसबुक समूहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात नागपुरातील प्रख्यात कलावंत पराग घोंगे आणि अनिल पालकरचा ह्यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ‘साई सभागृहा’त संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते राजे मुधोजी राजे भोसले तसेच प्रमुख अतिथी होते विदर्भ गौरव प्रतिष्ठान चे गिरीश गांधी तर विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित पोलीस उपयुक्त अशोक बागुल होते.
आनंद यात्री समूहातर्फे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश रेवतकर, विद्या उमाळे, स्वाती दिवेकर, अस्मिता महिंद्रकर, विवेक गोतमारे, तेजस भातकुलकर आणि प्रतिभा वाळके यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन अस्मिता महिंद्रकर/ स्वाती दिवेकर ह्यांनी केले तसेच प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय रुपेश रेवतकर, लीना पाटील आणि विद्या उमाळे ह्यांनी करून दिला .