विष प्राषण करून सामूहिक आत्महत्येचा ईशारा 

संदीप बलवीर, प्रतिनिधी

– मोराराजी टेक्सटाईल्स कामगारांची व्यथा ऐकनारा कोणीही वाली नाही

– कामगारांच्या न्याय हक्कासाठी जीव गेलं तरी पर्वा नाही-कामगार प्रतिनिधी 

नागपूर :- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील मोराराजी टेक्सटाईल्स कंपनीच्या व्यवस्थापनाचा मनमानी कारभार, कामगारांची होतं असलेली आर्थिक व मानसिक पिळवणुकीला कंटाळून व गत तीन महिन्यापासून येथील स्थायी व आस्थायी कामगारांचा पगार न दिल्यामुळे कामगारांवार उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आपल्या हक्काचा, कामाचा पगार मिळत नसून लोकांसमोर किती दा हाथ पसरवून उधार उसनवारी करायची त्यापेक्षा मेलेलं बरं हीच भावना उराशी बाळगून दि 08 मे ला दुपारी 12 वाजता येथील कामगार प्रतिनिधीसह कामगार सामूहिक आत्महत्या करतील असा ईशारा वजा ताकीद येथील कामगार प्रतिनिधिने कंपनी व्यवस्थापन, शासन व प्रशासनाला दिली आहे.

बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात मोरारजी टेक्सटाईल ही कपडा उत्पादन करणारी अग्रगन्य कंपनी आहे. परंतु येथील कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना आता पर्यंत दिवाळी बोनस तसेच गत तीन महिन्यांचा पगार,ले ऑफ वेतन न दिल्यामुळे येथील जवळपास 2000 स्थायी व आस्थायी कामगारांनी दि.17 एप्रिल पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.कामगार न्यायाच्या अपेक्षेने शासन दरबारी चकरा मारत असून अक्षरशः न्यायाची भीक मागूनही शासन-प्रशासन हे डोळेझाक करत कामगारांच्या वेदनांवर फुंकर न घालता शांतपणे डोळे मिटून तमाशा बघत आहे.त्यामुळे कामगारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याची परवानगी सहा दिवसांच्या आत मिळण्याबाबत चे पत्र दि.20 एप्रिल ला नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांना देण्यात आले होते.तरी अजून पर्यंत जिल्हाधिकारी यांना कामगारांविषयी कुठल्याप्रकारे जिव्हाळा निर्माण झाल्याचे दिसून आला नसून कामगारांना न्याय मिळाला नाही व कामगारांना विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याची परवानगी ही मिळालेली नाही. तरी शासन प्रशासनाला पुन्हा 3 दिवसाचा अवधी देऊन न्यायची भीक कामगारवर्ग करीत आहे.जर या येणाऱ्या तीन दिवसात कामगारांना न्याय मिळाला नाही तर दि 08 मे ला दुपारी 12 वाजता कामगार प्रतिनिधीसह शेकडो कामगार विषप्राशन करून सार्वत्रिक आत्महत्या करणार असल्याचा ईशारा कामगारांनी दिला असून संबंधित परिस्थितीला कंपनी व्यवस्थापन,प्रशासन व शासन जबाबदार राहील अशी माहिती कामगार प्रतिनिधी यांनी दिली.

NewsToday24x7

Next Post

फ्री जेनेटिक डिजिटल ब्लड मैच ऐप से होगी थैलेसीमिया व सिकलसेल रोग की रोकथाम - डॉ. विंकी रूघवानी

Sat May 6 , 2023
8 मई विश्व थैलेसीमिया दिवस नागपूर :- हाल ही में थैलेसीमिया एंड सिकलसेल सोसाइटी ऑफ इंडिया द्वारा एक नए इनोवेशन के रूप में फ्री जेनेटिक डिजिटल ब्लड मैच ऐप लाया गया है जिसका उद्घाटन आरएसएस के सरसंघचालक मोहन भागवत के हाथों किया गया। यह ऐप देश में थैलेसीमिया और सिकलसेल रोग के प्रति जागरूकता, परामर्श और रोकथाम में मदद करेगा। […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com