संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरातील प्रभाग क्र. ६ पिपरी येथे बुद्ध बिहारात नगरसेविका संगिता खोब्रागडे यांनी आंतर राष्ट्रीय योग दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून योग दिवस थाटात साजरा केला.
कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित आरोग्य वर्धीनी लता दुधबाडे, आरोग्य सेवक विलास सहारे, जि प शाळेची शिक्षिका भारती हुमने सह मान्यवरांचा हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
आरोग्य वर्धीनी लता दुधबाडे यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकार चे योगासने करण्यात आले. कार्यक्रमात योगासन प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व सांगितले. नियमित योगा सने केल्याने पोट, मान, डोळे आणि शरिरातील विविध विकार दुर होतात. तणावमुक्त राहण्यासाठी नियमित योगासने करावीत, योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्ये काने योगदान द्यावे असे आवाहन आरोग्य वर्धीनी लता दुधबाडे यांनी नागरिकांना केले आहे.
पिपरी बुद्ध बिहारात नियमित क्लासेस होतात – नगरसेविका संगिता खोब्रागडे
योग दिवस निमित्त नगरसेविका संगिता खोब्रागडे यांनी सांगितले कि, नागरिकांचे स्वास्थ्य, आरोग्य निरोगी राहवे यासाठी पिपरी बुद्ध बिहारात नियमित योगासनाचे वर्ग घेतले जातात. करिता नागरिकांनी आपले स्वास्थ्य निट निटके ठेवण्याकरिता दररोज सकाळी पिपरी बुद्ध बिहारात योगासन वर्गा मध्ये जास्तीस जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका संगिता खोब्रागडे यांनी नागरिकांना केले आहे.