दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा बसेस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती

मुंबई :- दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत दि.२९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही  चन्ने यांनी केले आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असे चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असेही चन्ने यांनी सांगितले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या “पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

Fri Oct 14 , 2022
मुंबई :-  कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights