खापरखेडा :- पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता आरोपी क्र. १) रजत उर्फ सतीश जनार्धन इंगोले, रा. डोरली ता. पारशिवनी खापरखेडा व आरोपी क्र. २) विनोद गणपत मोजे, रा. वार्ड नं ३ दहेगाव हे दिनांक ३१/५/२४ चे ०३/२० वा. चे दरम्यान पारशिवनी टि पॉईट भानेगांव येथे कोणताही परवाना नसतांना अवैदयरित्या उत्खनन करुन ४ ब्रास रेती किंमती अंदाजे १६०००/- रु ची वाहतुक करतांना मिळुन आल्याने एकुन १,१६,०००/- रु चा मुददेमाल जप्त करुन आरोपीतांविरूद्ध कलम ३७९, १०९ भादंवी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल साहिता १९६६, सहकलम ४/२१ खान खनिज अधि १९५७ सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि, १९८४ अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांचे नेतृत्वात त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली.