नागपूर :- नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त पंधरे यांना प्रभाग क्र. 30 ( बिडीपेठ ) येथील नागरिकांच्या अनेक समस्या बाबतीत बुधवार दिनांक 8 मे २०२४ रोजी, शिवसेने तर्फे निवेदन देण्यात आले. प्रभाग 30 मध्ये काही भागातील चेम्बर वर झाकण तुटलेले आहेत. अचानक अवकाळी पावसाच्या पाण्याने लाईनचे चेम्बर भरलेले आहेत. नळाला गढुळ पाणी येत आहेत. दत्तात्रय नगर मधील दोन लोकांना डेंग्यू सारखा आजार झालेला आहेत. जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहेत. आठ आठ दिवस झाडु वाले येत नाही. अश्या कितेक समस्या आहे.
सिध्दुजी कोमजवार माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित विलास मठकर, अशोक पौनीकर, अरुण कुकडे, रविन्द्र बोरकुटे, हिमांशू सहारे, गजानन कोकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.