संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अग्रवाल कुटुंबियांच्या वतीने कामठी शहरातील सराय के बालाजी संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आले तसेच भाविकांसाठी भव्य ‘श्री प्रसाद’वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या महाप्रसादाच्या मोठ्या संख्येतील भाविकांनी आस्वाद घेतला.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे दूत पवनपुत्र हनुमान यांची जयंती आज 23 एप्रिल ला मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात अखंड रामायण समापन,हवन पूजन , महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाविकांनी सहभाग नोंदविला होता.