सराय के बालाजी मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अग्रवाल कुटुंबियांच्या वतीने कामठी शहरातील सराय के बालाजी संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आले तसेच भाविकांसाठी भव्य ‘श्री प्रसाद’वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या महाप्रसादाच्या मोठ्या संख्येतील भाविकांनी आस्वाद घेतला.

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे दूत पवनपुत्र हनुमान यांची जयंती आज 23 एप्रिल ला मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात अखंड रामायण समापन,हवन पूजन , महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाविकांनी सहभाग नोंदविला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

Wed Apr 24 , 2024
मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com