संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- युवा चेतना मंच तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भा.ज.पा कामठी तालुका उपाध्यक्ष अतुल ठाकरे , रामटेक विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पाटील, कामठी विधानसभा विश्वकर्मा योजना प्रमुख अमोल नागपुरे, दिव्यांग फाउंडेशन सचिव बाॅबी महेंद्र, भा.ज.पा रनाळा शाखा महामंत्री हिमांशू लोंडेकर जेष्ठ नागरिक संघटनेचे गणेश सपाटे , दशरथ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली . याप्रसंगी अमोल जे नागपुरे यांनी व दिव्यांशी बोरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले तर अध्यक्षीय भाषणातून निखिल पाटील यांनी ” अन्याया विरूध्द वाचा फोडून बनले बहुजनांचा आधार , मानवाला मानुस म्हणुन जगण्याचा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त करून दिला ” असे मत या प्रसंगीत्यानी मांडले . याप्रसंगी रमण बोढारे, राधेश्याम कुल्लरकर ,आशुतोष मेंढे,स्वयम बागडे , चैतन्य बागडे, कु श्रुष्टी पिपरोडे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पराग सपाटे तर आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले.