यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले.
नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव कुणाल प्रकाशराव जानकर असे आहे. तसेच आज 12 व्यक्तींनी 26 नामांकन अर्जाची उचल केली. याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकून 60 व्यक्तींनी 120 अर्जाची उचल केली आहे.