संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- काळ बदलत चालला आहे तसा मनुष्यही रंग बदलत चालला आहे ज्या आई वडिलांनी आपले लहान बाळ असताना तळहातातील फोडा प्रमाणे ज्याला जपले त्यांचे शिक्षण , दैनंदिन गरजा पूर्ण केल्या व आपली आशा आकांक्षा कमी करून मुलांना घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अशा मुलाकडूनच वृद्ध आई वडिलांची अवहेलना आजच्या आधुनिक युगात होत असल्याचे दिसून येत असून कामठी बस स्थानक चौकात अशे कित्येक वृद्ध आई वडील भिक्षा मागुण स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत तर काहींना अशा परिस्थितीत वेडसर वृत्ती सुदधा अंगीकृत झाली आहे.
सुगरणीच्या खोप्या प्रमाणे कुटुंबात नाते जोपासण्यात येतात मात्र लहान मुले मोठ्या झाल्यावर आई वडीलांची अवहेलना करतात तेव्हा ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना का केली जाते?हा चिंतनाचा विषय असून कामठी तालुक्यात अशी कित्येक वृद्ध मायपित्याची आधुनिक श्रावण बाळाकडून अवहेलना होत असलयाचे दिसून येते.कामठी तालुक्यात ज्येष्ठ नागरिक हा पूर्वीसारखा सुखसंपन्न राहिला नसल्याचे दिसुन येते कारण की पुरातन काळात ज्येष्ठांचे आदरतीथ्य होत असायचे, ज्येष्ठांचा शब्द कुटुंबातील प्रत्येक सदस्य पाळत असायचा .परंतु आताच्या काळात कुटुंब, समाज व हित संबंध हे इतिहास जमा होत असल्याचे दिसून येत आहे याला जवाबदार कोण?हे कोणामुळे घडते आदींचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागतो याचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे तर कामठी तालुक्यात एकही वृद्धाश्रम नसल्याने वृद्ध आई वडिलांची अवहेलना होत असून निराधारा सारखे फिरत आहेत तेव्हा संबंधित प्रशासनाने अशा वृद्ध मायपित्याची अवहेलना करणाऱ्या आधुनिक मुलावर कारवाहीचा बडगा वाजवावा अशी मागणी जोर धरत आहे.
@ फाईल फोटो