नागपूर :-दिनांक २१/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. मौदा परीसरात अप. क्र. २७२/२४ कलम ३७९ भा.द.वी. चे गुन्ह्यात आरोपी यांचे शोध घेत असता मुखबिरद्वारे खबर मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा मीनीमाता नगर नागपूर येथे राहणारा राहूल ठाकरे आहे. यावर राहुल ठाकरे यास त्याचे घरातुन ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने मौदा, तसेच नागपूर शहर, वर्धा, जवाहर नगर, मोर्शी येथून मोटारसायकली चोरून त्याचे मुळगावी सातनेर जि. बैतुल (mp) येथे त्याचा लहान भाऊ दिनेश सुखचंद खाकरे, वय ३७ वर्ष, रा. सातनेर त. आठनेर जि. बैतुल (mp) याचे व त्याचा नातेवाईक राधेश्याम दुर्गाचरण हीडोडे, वय १९ वर्ष, रा. सातनेर त. आठनेर जि. बैतुल (mp) याचे मदतीने त्याचे मूळगावी व आजूबाजूच्या गावात विकल्याचे सांगितले. राहुल सुखचंद ठाकरे, वय ४२ वर्ष, रा. मिनीमाता नगर नागपूर यास घेऊन त्याचे मूळगावी सातनेर जि. बैतुल (mp) येथे जाऊन तेथून दिनेश व राधेश्याम यास ताब्यात घेऊन त्याचे कडुन मौदा येथून चोरी गेलेल्या व नागपूर शहर, जवाहर नगर, वर्धा, मोर्शी, येथून चोरी केलेल्या २१ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली एकूण किंमती १० लाख ३० हजार रुपये सर्व मोटारसायकली ताब्यात घेवून जप्त केल्या. गुन्हयातील सदर आरोपी यांची मेडीकल तपासणी करुन जप्ती मुद्देमालासह पुढील तपासा करीता पोलीस स्टेशन मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.
उघडकीस आलेले गुन्हे
१) पो.स्टे. मौदा अप. क्र. १४/२४ कलम ३७९ भादंवी.
२) पो.स्टे. मौदा अप. क्र. २७२/२४ कलम ३७९ भादंवी.
तसेच पो.स्टे. वर्धा, पो.स्टे. जवाहर नगर, पो.स्टे. मोर्शी, पो. स्टे. कळमना, लकडगंज, MIDC गिट्टीखदान, नंदनवन, हिंगणा, बेलतरोडी, गणेशपेठ येथील १९ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, PSI बडूलाल पांडे, ASI नाना राऊत, HC विनोद काळे, ईकबाल शेख, प्रमोद भोयर NPC संजय बरोदीया, सायबरचे सतिश राठोड चालक HC मोनू शुक्ला यांनी पार पाडली.