सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ७५ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता: १२) रोजी उपद्रव शोध पथकाने ७५ प्रकरणांची नोंद करून ३३ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २६ प्रकरणांची नोंद करून १० हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून ७०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून १ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ०६ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायिकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलाबा/ टाकावू कचरा टाकणे/ साठवणे प्रथम या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ०३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २५ प्रकरणांची नोंद करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०६ प्रकरणांची नोंद करून ०६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०१ प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवार (ता: १२) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०१ प्रकरणांची नोंद करून ०५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धंतोली झोन येथील मे. क्रिस्टल फर्निचर यांच्यावर कार्यवाही करीत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ०२ प्रकरणाची नोंद करून १५ हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MAJ GEN YOGENDER SINGH, VSM ADDITIONAL DIRECTOR GENERAL NCC VISIT TO NCC GROUP HEADQUARTERS, NAGPUR

Wed Mar 13 , 2024
Nagpur :-Maj Gen Yogender Singh, VSM is on his maiden visit to Nagpur and Amravati NCC Units and Group Headquarters from 11 to 13 Mar 2024. As part of his visit schedule, he arrived on 11 Mar at Nagpur and was received by Group Captain Khushal Vyas, Group Commander NCC NAGPUR. He visited the Baffle firing range at Boregaon and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com