समृद्धी महामार्ग ~ किलर किंग !

– हायवे हायपोनासिस : पुन्हा ३ जणांचा बळी !!

नागपुर :- या समृद्धी हायवे वर ड्रायव्हर आणि अन्य प्रवाश्यांसाठी कोणतेही विश्रांती थांबे किंवा विसाव्याच्या सोई सुविधा निर्माण न करता फक्त कोट्यवधीचा टोल टॅक्स वसुली चे लक्ष्य पुढे ठेवून हा महामार्ग प्रवाशांचे बळी घेण्यासाठी च खुला करण्यात आला.

सरकारला कित्येक रिपोर्ट सादर करून सुद्धा जलद गतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने मुडदे पाडणे असेच सुरू राहील कां ?

आज पहाटे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर जवळ समृद्धी महामार्ग पुन्हा रक्ताळला आणि तीन प्रवासी चिरडून सर्वत्र किंचाळ्या व आक्रोश पाहून परिसर दणाणून गेला ! १५ पेक्षा जास्त प्रवासी कमी जास्त प्रमाणात जखमी झाले त्यातील ८ गंभीर आहेत , भरधाव बस कंटेनर चे मागून धडकून जो जबरदस्त झटका बसला, त्यामुळे अनेक प्रवासी मणका मोडून कायमचे पंगू होण्याचा धोका आहे !

या सरकारला जाग कधी येईल हे प्रभू श्रीरामचंद्रच जाणो !

NewsToday24x7

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण

Fri Jan 26 , 2024
मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कारसेवक व ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांच्या हस्ते शुक्रवारी ध्वजारोहण तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान , प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com