नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत, ३७, ३८/ बी, वैष्णव पार्क, बेलतरोडी रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी ताराचंद गिरभारीलाल शर्मा, वय ४५ वर्षे हे ठेकेदारीचे काम करतात, त्यांनी घरमालक नामे प्रशांत नत्थ्यूजी शेंडे रा. प्लॉट नं. ४३, खसरा नं. १६/२/४, मौजा चिंनभवन, नागपूर यांचे प्लॉट वर घरबांधकाम घेतल्याने, दिनांक ०१.०३. २०२४ चे ०६.०० वा. ते दि. ०८.०३.२०२४ चे १०.३० वा. चे दरम्यान, घर बांधकामासाठी लागणारे लोखंडी पाईप व लोखंडी सेट्रींग प्लेट किंमती अंदाजे १,५५,०००/- रू. चा मुद्देमाल आणुन ठेवला असता, नमुद मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला,
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे बेलतरोडी येथे पोउपनि, गोरडे यांनी आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.द.वि, अन्वये गुन्हा दाखल केला, तात्काळ दखल घेवून संशयावरून आरोपी नामे भुपेन्द्र सेवकराम बगारे, वय ३० वर्षे, रा. कटंगी, जि. बालाघाट (म.प्र.) यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याचे ईतर साथिदार सोबत संगणमत करून चोरी केल्याचे कबुल केले, आरोपी भुपेन्द्र बगारे यास अटक केली असुन, त्याचे ईतर साथीदार पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.