– शेतकरी नेते किशोर तिवारी, आदिवासी नेते अंकित नैताम शेकडो शेतकरी विधवांना पोलिसांकडून नोटीस बजावली, शेतकऱ्यांचे शोषण,बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्यांवर मोदी यांना जाब विचाण्यासाठी शेतकरी नेते किशोर तिवारी यवतमाळात दाखल होणार !
यवतमाळ / नागपूर :- भाजपा चे प्रमुख स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या प्रचार सभेत शेतकऱ्यांचे शोषण,बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्यांवर मोदी यांना जाब विचाण्यासाठी शेतकरी नेते आणि शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांचे नेतृत्वात शेकडो शेतकरी विधवा आणि बचत गटाच्या महिला यवतमाळात दाखल होण्याचे पूर्व संधेवर आज संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांनी प्रचंड मुस्कटदाबी सुरू केली असून शेतकरी नेते किशोर तिवारी सह शेकडो शेतकरी विधवांना पोलिसांकडून फौजदारी दंड संहितेच्या १४९ कलमाखाली नोटीस बजावून मुस्कटदाबी करण्याचे तंत्र पोलीस यंत्रणेने वापरले आहे, याचा तीव्र निषेध किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
याची प्रश्र्वभुमी अशी की गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सतत दुर्लक्ष केल्याने होत असलेले शेतकऱ्यांचे शोषण, त्यांच्या दुर्दैवी आत्महत्या, बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्यांवर नरेंद्र मोदी तोंड कधी उघडनार ? असा सीधा सवाल किशोर तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्या आधी उपस्थित केला होता. त्याला संपूर्ण देश भर प्रसार माध्यमांनी उचलून धरले होते. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील दाभाडी या गावी “चाय पे चर्चा” हा कार्यक्रम गाजावाजा करून दिलेली सर्व आश्वासने आता १० वर्षानंतर सुद्धा खोटी ठरली असल्याचे आणि भाजपा सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य माणसाची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी करून या संबंधात तिवारी यांनी एक पत्र नरेंद्र मोदींना पाठविले असून त्यात अनेक गंभीर वास्तविक विषयावर प्रकाश टाकला.
त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना लेखी निवेदन देवून मोदी यांचेवर कटाक्ष साधून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू, दोन कोटी रोजगार देवू, महागाई वर लगाम आणू, पेट्रोल ~ डिझेल~ गॅस चे भाव कमी करू, शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या थांबवू आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी प्रमुख आश्वासने भाजपा ने दिली होती. १० वर्षात यातील एक ही शब्द नरेंद्र मोदी सरकारने पाळला नसून एकी कडे शेतीवर चा खर्च दुप्पट झाला तरी आज सरकार हमी भाव सुद्धा द्यायला तयार नाही, कापूस ~ सोयाबीन चे भाव पडले असतानाही केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सी.सी.आय. आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडुन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शिक्षण ~ आरोग्य यांचे वरील खर्च तिप्पट झाला आहे, बेलगाम महागाई ने आम आदमी हैराण आहे, पेट्रोल ~ डिझेल~ गॅस चे भाव असमानाला भिडले आहेत, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार राजरोस पने सुरू असून नरेंद्र मोदी या गंभीर विषया वर आपले तोंड कधी उघडणार ? असा सीधा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात केला.
त्यानंतर या असंतोषाचे प्रश्र्वभूमी खाली आज सकाळ पासून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांनी प्रचंड मुस्कटदाबी सुरू केली असून शेतकरी नेते किशोर तिवारी व आदिवासी नेते अंकित नैताम सह शेकडो शेतकरी विधवांना पोलिसांकडून फौजदारी दंड संहितेच्या १४९ कलमाखाली नोटीस बजावून मुस्कटदाबी करण्याचे तंत्र पोलीस यंत्रणेने वापरले आहे !
तरीही मोदी यांना जाब विचाण्यासाठी शेतकरी नेते किशोर तिवारी यवतमाळात दाखल होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे