संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावरील कामठी येथील प्रबुद्ध नगर जवळील महादेव डेली निडस समोरून नागपूर हुन नागसेन नगर स्वगृही भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकी क्र एम एच 40 सी एन 5929 च्या स्वाराने समोरील दुचाकी ला ओव्हरटेक करण्याच्या बेतात दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी वर बसलेले इतर दोन तरुण गंभीर जख्मि झाले असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
मृतक तरुणाचे नाव धमेश देशभ्रतार वय 27 वर्षे रा नागसेन नगर कामठी ,तर दुचाकीवर सोबत बसलेले जख्मि चे नावे हिमांशू लोणारे वय 20 वर्षे, तेजस कडबे वय 20 वर्षे दोन्ही राहणार नागसेन नगर कामठी असे आहे.पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.