दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यु, इतर दोन जख्मि

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावरील कामठी येथील प्रबुद्ध नगर जवळील महादेव डेली निडस समोरून नागपूर हुन नागसेन नगर स्वगृही भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकी क्र एम एच 40 सी एन 5929 च्या स्वाराने समोरील दुचाकी ला ओव्हरटेक करण्याच्या बेतात दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी वर बसलेले इतर दोन तरुण गंभीर जख्मि झाले असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

मृतक तरुणाचे नाव धमेश देशभ्रतार वय 27 वर्षे रा नागसेन नगर कामठी ,तर दुचाकीवर सोबत बसलेले जख्मि चे नावे हिमांशू लोणारे वय 20 वर्षे, तेजस कडबे वय 20 वर्षे दोन्ही राहणार नागसेन नगर कामठी असे आहे.पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Tue Feb 27 , 2024
· मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा मुंबई :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights