भाजपने सीबीआय व इडी मार्फत अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र तयार केला आहे

– AAP ने INDIA आघाडी मध्ये जागा वाटपाची चर्चा यशस्वीपणे पूर्ण केल्याची बातमी समोर येताच 

नागपुर :- संपूर्ण देश गेल्या दोन दिवसांपासून, उत्सुकतेत आहे की AAP ही INDIA आघाडीची चर्चा यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचवत आहे. जवळ जवळ सर्व राज्यांमध्ये जागा वाटपाची संबंधित संपूर्ण प्रक्रिया लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट नसताना भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.पण जागा वाटपाच्या निष्कर्षापर्यंत INDIA आघाडी AAP ने पोहचवली ही बातमी येताच भाजप मध्ये धक्कादायक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता भाजपने आघाडी तोडण्यासाठी महाषडयंत्र आखल आहे. आणि यातून आम आदमी पार्टी चे खच्चीकरण करून देशाची आशा असेलली आम आदमी पार्टी तिला कसे थांबवता येईल असे अनेक षडयंत्र आखून प्रयत्न सुरु आहे.

“कालपासून ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना भाजपा च्या लोकांकडून मॅसेज मिळत आहेत की, ‘आप’ ने INDIA आघाडी सोडली नाही, तर नरेंद्र मोदी सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करतील अशी सरळ सरळ धमकी देणे सुरु आहे.

“संपूर्ण देशाला माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मोदीनी खोट्या बनावट दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला अरविंद केजरीवाल यांना गुंतवण्यासाठी धारेवर धरले आहे. गेल्या दोन वर्षात 1000 हून अधिक छापे टाकण्यात आले, ED ने 7 समन्स पाठवले, CBI ने अनेक नोटीस पाठवल्या, अरविंद केजरीवाल ची CBI ने 9 तास चौकशी केली, पण CBI आणि ED दोघेही करू शकले नाहीत. एक पैसा किंवा ठोस पुरावा शोधले नाही.अनेक अधिकाऱ्यांना भाजपा च्या वरिष्ठ नेत्यांच्या कडून काहीही करा आणि केजरीवाल यांना खोट्या केसेस मध्ये गुंतवा असे आदेश गेले आहेत. पण आता INDIA आघाडी ची चर्चा पूर्ण होत असताना, मोदीजींना 2024 च्या लोकसभा निवडणुका हरण्याची भीती वाटते.”

डॉ. शाहिद जाफरी वरिष्ठ आप नेते यांनी सांगितले आता असे समजण्यास वावगं नाही आहे की लवकरच – 1 किंवा 2 दिवसांत – CBI किंवा ED नोटीस जारी करणार आहे आणि त्यानंतर लवकरच, आणखी 1 किंवा 2 दिवसांत – CBI आणि ED दोघेही अरविंदजी यांना अटक करतील.असे आदेश CBI व ED च्या अधिकाऱ्यांना भाजप च्या वरिष्ठ पातळीवरून आले आहेत.

“आम आदमी पार्टी च्या वरिष्ठ नेत्यांना असे धमकवण्यात येत आहे की जर AAP ने INDIA आघाडी सोडली तर CBI नोटीस पाठवणार नाही किंवा ED अरविंद केजरीवाल यांना अटक करणार नाही. पण ‘आप’ हा नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या कोणत्याही एजन्सीला घाबरणारी पार्टी नाही – मग ती CBI किंवा ED असो . ‘आप’ देशातील जनतेसाठी लढत राहील. कितीही बलिदान द्यावे लागले तरी देश हितासाठी आम आदमी पार्टी ही INDIA आघाडीचा भाग राहील.व देशातील जी भीषण स्थिती अहे त्यातुन देशाला वाचवेल.” असे प्रतिपादन भूषण ढाकूळकर महाराष्ट्र राज्य संघटन सचिव आम आदमी पार्टी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

12वी आणि 10वीच्या परीक्षा तारखांबाबत संभ्रम निर्माण करु नये - राज्य शिक्षण मंडळाचे आवाहन

Sat Feb 24 , 2024
नागपूर :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. या दोन्ही परीक्षांच्या तारखांबाबत विविध माध्यमे तसेच समाज माध्यमांवर अफवा प्रसारीत झाल्यास त्यास बळी पडू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!