रेल्वेगाडीतून खाली पडलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे फाटक मार्गे नागपूर हुन गोंदीयाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या रेल्वेगाडीतील एका अविवाहित प्रवासी तरुणाचा तोल जाऊन रेल्वे गाडीखाली पडल्याने घडलेल्या गंभीर अपघातात सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी साडे बारा दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव राजू धोंगडे वय 36 वर्षे रा लालगंज नागपूर असे आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून मृतकाच्या पाठीमागे आई,सात भाऊ व एक बहिण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंटरकनेक्शनच्या कामासाठी दिप्ती सिग्नल चौक आणि जयताळा ईएसआरवर शटडाउन...

Fri Feb 23 , 2024
#बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही… नागपूर :- सेवेची विश्वासार्हता वाढविण्याच्या प्रयत्नात, OCW (ऑरेंज सिटी वॉटर) आणि NMC (नागपूर महानगरपालिका) यांनी AMRUT योजना 2.0 अंतर्गत जयताळा ESR वर 12 तास आणि दिप्ती सिग्नल चौकात 16 तास शटडाऊनची योजना आखली आहे. हे शटडाउन खाली नमूद केलेल्या कारणांमुळे होणार आहेत: 1. जयताळा ईएसआर: 24 फेब्रुवारी 2024 रोजी जयताळा ईएसआर जवळ सकाळी 10 ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!