गृहमंत्र्याच्या शहरात आणखी दोन हत्याकांड

– उपराजधानातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर

नागपूर :- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात आणखी दोन हत्याकांड घडले. दोन्ही हत्याकांड नंदनवन परीसरात घडले असून नंदनवन पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.

पहिल्या हत्याकांडात लकडगंजमधील जुगार अड्डा चालविण्यासाठी झालेल्या पैशाच्या वादातून तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्रांनी दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. हा थरार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नंदनवनमधील संघर्षनगर झोपडपट्टी परीसरात घडला. नीरज शंकर भोयर (३०, गरोबा मैदान, लकडगंज) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल भगवान राऊत (३२,क्वेटा कॉलनी) असे गंभीर युवकाचे नाव असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या पंधरवाड्यातील पाचवे हत्याकांड असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लकडगंज परिसरात पोलिसांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे मोठमोठे जुगार अड्डे सुरु आहेत. जुगार अड्ड्यावरील कमाईच्या पैशाचा वाद आरोप विलास ऊर्फ मटर रामकृष्ण वानखडे (हिवरीनगर)याचा विशाल राऊत आणि नीरज भोयर यांच्यासोबत होता. त्यावरून शुक्रवारी सकाळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास संघर्षनगर झोपडपट्टीत नीरज आणि विशालवर विलासने आपल्या साथिदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात नीरज भोयर याचा मृत्यू झाला तर विशाल हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या हत्याकांडात, सचिन यशवंत उईके (३०, जुना बगडगंज) हा कारचालक होता. तो आरोपी दर्शन रविंद्र भांडेकर (२३, बाभुळबन) याच्याकडे कारचालक म्हणून नोकरी करीत होता. सचिन गेल्या दोन दिवसांपासून कामावर जात नव्हता.

त्यामुळे आरोपी मालक दर्शन हा चिडून होता. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जुना बगडगंज चौकात सचिन उभा होता. दरम्यान, तेथे दर्शन आला. दर्शनने सचिनला कामावर येत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. त्यानंतर सचिनला मानेवर जोरात फटका मारला. त्यामुळे सचिन बेशुद्ध पडून मृत पावला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी सुरुवातीला आरोपी दर्शनला वाचविण्याचा प्रयत्न केला.

शेवटी नातेवाईकांच्या दबावानंतर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी दर्शन भांडेकरला अटक केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली होती. मात्र, आयुक्त पुण्याला जाताच शहरात अस्ताव्यस्त परिस्थिती आहे. बंद पडलेले अनेक जुगार अड्डे सुरु झाले असून डीबी पथक आणि गुन्हे

शाखेच्या पथकाच्या अर्थपूर्ण हालचाली सुरु केल्या आहेत. गुन्हे शाखेत रोशनसारखे वादग्रस्त कर्मचारी आल्याने अनेक अवैधधंदे चा लक त्याच्या संपर्कात आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूकीकरिता आमदार रोहित पवार व जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्या नावाचा प्रस्ताव पारित

Sun Feb 11 , 2024
भंडारा :- राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्या दिनांक ८ फेब्रु. २०२४ रोजी भंडारा येथील विश्रामगृह येथे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी यांच्या अध्यक्षतेखाली व नरेश ईश्वरकर जिल्हा परिषद सदस्य तथा भंडारा जिल्हा संघटणमंत्री तसेच एकनाथ फेंडर जिल्हा परिषद सदस्य तथा तुमसर-मोहाडी विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने येणार्‍या लोकसभा निवडणुक संदर्भात पक्षाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com