देवलापार :-दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलीस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलीस स्टेशन हद्दीत स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर कडुन नागपुर कडे देवालापार मार्गे एका ट्रकमध्ये अवैध्यरित्या जनावर वाहतूक करून देवलापार दिशेने येत आहे. अशा माहीती वरून पोस्टे समोर देवलापार समोर नॅशनल हायवे क्र. ४४ जबलपुर ते नागपुर रोडवर स्टाफसह नाकाबंदी लावली असता खबरीने सांगितलेल्या माहीती प्रमाणे वाहन क्र. MH-29/R-4295 ला नाकावंदी ठिकाणी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते सदर ठिकाणी न थांबता नागपुर दिशेने पळुन गेली तरी सदर वाहनाचा पाठलाग करून टोल नाका खुमारी जवळ तपासणी केली असता वाहनात आखुड दोरखंडाने गोवंशांचे तोंड, मान, पाय अत्यंत क्रुरतेने व निर्दयतेने बांधलेले एकुण ०७ गोवंश (गायी) असे एकुण जनावरे किंमत १,०५,०००/- रू.व वाहन क्र. MH-29/R-4295 किंमत ५,००,०००/-रू असा एकुण ६,०५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करुन जनावरांची योग्यरित्या चारा-पाणी व देखभाल होणे करीता सदरची जनावरे गो-शाळेत दाखल करण्यात आले व पोस्टेला अप क्र. २९/२०२४ कलम २७९ भादवी सहकलम ११ (१) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ५ (अ), ९ महा. प्राणि संरक्षण सहकलम १८४ मोवाका सहकलम ११९ मपोका अन्वये गुन्हा नोंद करुन तपासावर आहे. तसेच दि.०२/०२/२०२४ रोजी मध्य रात्री गुप्त बातमीदाराचे बातमी वरून नॅशनल हायवे क्र. ४४ जबलपुर ते नागपुर जाणारा रोड मानेगावटेक येथे स्टाफसह नाकाचंदी लावुन खबरेप्रमाणे ट्रक वाहन क्र. MH-29/T-2003 ला नाकावंदी ठिकाणी थांबवुन तपासणी केली असता ट्रक मध्ये आखुड दोरखंडाने गोवंशांचे तोंड, मान, पाय अत्यंत क्रुरतेने व निर्देयतेने बांधलेले जिवंत १८ गोवंश (बैल) त्यांपैकी ०४ गोवंश मृत जिवंत गोवंश किंमत २,७०,०००/- व वाहन ट्रक क्र. MH- 29/T-2003 किंमती १५,००,०००/-रू असा एकुण १७,७०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन जनावरांची योग्यरित्या चारा-पाणी व देखभाल होणे करीता सदरची जनावरे गो-शाळेत दाखल करण्यात आले व पोस्टे ला अप क्र. ३०/२०२४ कलम २७९, ४२९ भादंवी सहकलम ११(१) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ५ (अ), ९ महा, प्राणि संरक्षण सहकलम १८४ मोवाका सहकलम ११९ मपोका अन्वये गुन्हा नोंद असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची कार्यवाही ही हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले सा, अपर पोलीस अधिक्षक नाग्रा, व आशित कांबळे सा, सहा. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनात सपोनि. राजेश पाटील ठाणेदार पो.स्टे. देवलापार, पोहवा राहुल रंगारी, पोना शिवा नागपुरे, पोना प्रमोद मडावी, पोशि/केशव फड, कांती हराळ, मनिष चौकसे, सचिन येळकर, बापोहवा कविराजवार यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहवा राहुल रंगारी हे करीत आहेत.