संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान पोलीसाची कारवाई, ५६ गौवंश ला जिवनदान देत ३७ लाख च्या वर मुद्देमाल जप्त.
कन्हान :- तारसा कडे जाणा-या तारसा रोडवरील नागपुर बॉयपास चारपदरी रोड उडाणपुला खालील सर्व्हीस रोड वर कन्हान पोलीसाना अवैधरित्या गौवंश जनावरांना कोबुन भरून वाहतुक करतांना तीन ट्रक पकडले. यातील दोन ट्रक व दोन ट्रक चालकाला ताब्यात घेतले तर एक ट्रक पसार झाला. दोन्ही ट्रक मधिल ५६ गौवंश भंडारा गौशाळेत जमा करून त्याना जिवनदान देऊन दोन ट्रक सह सदोत्तीस लाख सत्तेचा ळीस हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कन्हान पोलीस करित आहे.
गुरूवार (दि.१) फेब्रुवारी ला हेकॉ सतिश फुटाणे सोबत नापोशि आशिक कुमरे यांचे सह वपोनि सार्थक नेहेते यांच्या आदेशाने पोस्टे कन्हान परिसरात रात्रीला पैट्रोलिंग करित असतांना मुखबिर व्दारे गुप्त माहिती मिळाली की, तारसा ते कन्हान रोडवर अवैधरित्या ट्रक मध्ये कत्तलीकरिता जनावरांची वाहतुक होत आहे अश्या खात्रिशिर खबरे वरून पंचानाम्यातील पंचांना माहिती देऊन सोबत पोलीस शिपाई सम्राट वनपती, निखील मिश्रा यांनी सकाळी ६ वाजता दरम्यान रोड वर नाकाबंदी केली असता ट्रक क्र. एमएच ४० सीडी ९२७१, एमएच ४० सीडी २१४८ व ट्रक क्र एमएच ४० बीएल ४४१३ असे ट्रक तारसा कडुन कन्हान कड़े येतांना दिसुन आले. त्यांना थांबविण्याच्या इशारा दिला असता पहिले दोन ट्रक चालकांनी थांबविले. सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता दोन्ही वाहनात जनावरे कोंबुन भरल्याचे दिसुन आले.चालक १) झनकलाल हृदयसिंग मरकाम, २) अय्युब शेख भुरू शेख दोन्ही रा. नागपुर याना विचारले असता सदर जनावर हे कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितल्याने दोन्ही चालकाना ताब्यात घेण्यात आले. त्याच वेळी ट्रक क्र. एमएच ४० बीएल ४४१३ चा चालक त्याचे वाहन घेऊन पळुन गेला.
५६ गौवंश व दोन ट्रक अशा एकुण ३७,४७,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे ला अप क्र ५५/२४ कलम ११ (१)(ए), ११ (१)(डी), ११ (१)(इ), ११ (१)(एफ), ११ (१)(आय) प्रा. छ. प्रति. अधि. १९६०, सह कलम ५ (अ), ५ (ब), ९ महा.प्रा.सं.अधि.१९९५, सह कलम ११९ मपोका, सहकलम ४२९,१०९, ३४ भादंवी अन्वये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून यातील गौवंश ला भंडारा लाखनी येथिल वेद गौशाळेत नेऊन जमा करून ५६ गौवंश ला जिवनदान दिले.
सदर कारवाई कन्हान पोस्टे चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात हेकॉ सतिश फुटाणे सोबत नापोशि आशिक कुमरे, शिपाई वैभव बोरपल्ले, सम्राट वनपर्ती, निखिल मिश्रा आदीने सिता फितीने यशस्विरित्या पार पाडली.