संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नजीकचे सहकारी व “जयभीम” नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल.एन. यांच्या 85 व्या निर्वाणदिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने काल 15 जानेवारीला कन्हान नदीच्या तीरावरील बाबू हरदास यांच्या समाधीस्थळी बाबू हरदास एल. एन. यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे सेंट्रल कॉर्डिनेटर व राज्याचे प्रभारी नितीन सिंग, प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोमारे, प्रदेश महासचिव व विदर्भ झोन इन्चार्ज सुनील डोंगरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य व विदर्भ झोन इन्चार्ज दादाराव उईके, राज्याचे सचिव व विदर्भ झोन इंचार्ज पृथ्वीराज शेंडे, यांनी नागपूर वरून पंधरा किलोमीटर अंतरावर कणा नदीच्या काठावर असलेल्या बाबू हरदास एल.एन. यांच्या समाधीवर जाऊन पुष्पचक्र अर्पित केले व “जयभीम” नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल. एन.अमर रहे, अशा घोषणा सुद्धा दिल्या. सर्वप्रथम कामठी मध्ये पहिल्यांदा पदार्पण केल्याबद्दल प्रदेश प्रभारी नितीन सिंग व प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोमारे यांचे पुष्प मालेने स्वागत करण्यात आले. यावेळी पूर्व नागपूर जिल्हा प्रभारी व वरिष्ठ बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी स्वतः हिंदी भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ “समाज क्रांति का नारा जयभीम बाबू हरदास की खोज” बसपा सेंट्रल कॉर्डिनेटर व प्रदेश प्रभारी नितीन सिंग यांना भेट दिला. याप्रसंगी प्रदेश प्रभारी नितीन सिंग व बस्पा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोमारे यांनी समता सैनिक दलाच्या शिबिराला भेट दिली. बसपा नेते मंडळी समाधी स्थळाकडे जातेवेळी वरिष्ठ बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब, बसपा महिला नेत्या माया उके,मोहम्मद शफी, दिलीप भस्मे,कामठी शहर उपाध्यक्ष सुनिता रंगारी, निशिकांत टेंभेकर, समीर खान, प्रीतम खोब्रागडे सोबत होते.