मुंबई :- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज या प्रकरणी निकालाचं वाचन करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असं दावा संजय राऊत यांनी केला आहे.