कन्हान :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर मौजा गाडेघाट रोड सुनिल सलून दूकानाचे समोरील रोडवर दिनांक २७/१२/२०२३ चे १०.४० वा. ते ११.२० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे सैय्यद शाहरूख रेशमा सैय्यद, वय २६ वर्ष, रा. अशोक नगर वार्ड क्र. ०५ कन्हान हा त्याचे मित्रसह घटनास्थळी बसुन बोलत असतांना दोन मोटर सायकलवर प्रत्येकी ०३ असे ६ लोक हातात चाकू आणि दंडे घेवून आले यातील आरोपी नामे १) विशाल नामदेव चिंचोडकर, रा वार्ड क ३ धरम नगर कन्हान याने फिर्यादीचा मित्र नामे लक्की नाईक यास “कल तू मुझको मारने आया था क्या” असे बोलून त्यास शिवीगाळ देत असतांना यातिल दूसरा आरोपी नामे २) सूमेश भिमराव रामटेके, वय ३१ वर्ष, रा. वार्ड क्र. २ प्रगती नगर गहहीवरा रोड कन्हान याने लक्की यास दंडयाने डाव्या हाताच्या मनगटावर मारत असतांना यातील फिर्यादी हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता आरोपी विशाल चिंचोळकर याने त्यास अश्लिल शिवीगाळ देवून २ ते ३ वेळा चाकूने वार केले परंतू फिर्यादी ते वार हुकवून पळुन जात असतांना आरोपी विशाल चिंचोळकर याने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या कमरेच्या खाली चाकूने वार करून जख्मी केले फिर्यादी पळत असतांना यातिल आरोपी सुमेश आणि साथीदार नामे-३) अविनाश उर्फ लंगडा सूखचंद सहारे, वय २३ वर्ष, रा. वार्ड क्र. २ तुकाराम नगर कन्हान ४) रितेश उर्फ पंम्प्या सूरेश चाहूके, वय २१ वर्ष, वार्ड क्र. २ प्रगती नगर गहुहौवरा रोड कन्हान व २ अनोळखी इसम यांनी दंडयांनी दोन्ही पायाला मारहाण केली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. कन्हान येथे आरोपीतांविरूद्ध कलम ३०७, २९४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भावि, कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर घटनास्थळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग कामठी मा. पोनि सार्थक नेहते पोस्टे कन्हान यांनी भेट दिली. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम पोलीस स्टेशन कन्हान हे करीत असुन सदर गुन्हयातील आरोपी क्र. ०१) ते ४) यांना अटक करण्यात आली आहे.