नागपूर :- पेशवाई संपविण्यासाठी महार बटालियनच्या तत्कालीन 500 शूरसैनिकांनी 30,000 पेशव्यांचा पराभव केला तो दिवस 1 जानेवारी 1818, त्या शौर्य दिनाच्या स्मृती प्रित्यर्थ भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी शौर्यस्तंभ उभारला. त्याला मागील 205 वर्षापासून नियमित अभिवादन केल्या जाते.
बसपा ने कही हम भूल ना जाये या अभियानांतर्गत त्या शूरवीरांच्या स्मृती प्रित्यर्थ शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी उद्या 1 जानेवारी ला सकाळी 11 वा. दक्षिण नागपूरच्या त्रिशरण चौक ते बालाजी नगर शौर्यस्तंभ पर्यंत एका शौर्य रॅलीचे व शौर्यस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात केलेले आहे.
बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बुथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्रिशरण चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवाळे यांनी केले आहे.