“पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या…”, मनोज जरांगे-पाटलांचा इशारा

पुणे :-मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी ( २८ डिसेंबर ) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. अशातच मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

“पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली, तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.

जरांगे-पाटील म्हणाले, “मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू.”

दरम्यान, गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी म्हटलं, “पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे. जेथे रस्त्यात थांबाल तेथेच स्वयंपाक करून खायचा आहे.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

Fri Dec 29 , 2023
नागपूर :- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवीन नागपूरच्या संकल्पनेला नव्या वर्षात वेग येणार आहे. एनएमआरडीए क्षेत्रातील 24 गावांमध्ये 1 हजार 353 कोटी रुपयांतून एक हजार किमीचे जलवाहिनी, सिवेज लाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा 24 गावांतील साडेआठ लाख नागरिकांना लाभ होणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचा (NMRDA) 1 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com