नागपूर :- ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन पुणे यांच्या विद्यमानाने राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदाराच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्याकरीता सोमवार, दिनांक 11 डिसेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता चाचा नेहरू बालोद्यान, आग्याराम देवी चौक, नागपूर येथून भव्य मोर्चा नागपूर विधान भवनावर महाराष्ट्राचे अध्यक्ष डोळसे पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील अंदाजे 30 हजार दुकानदारांसह भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला.
मोर्चाचे शिष्टमंडळ आमदार संतोष बांगर व आमदार तानाजी मुटकुरे यांचेसह अध्यक्ष डोळसे पाटील, सचिव म्हमाणे, कार्याध्यक्ष संजय पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक एडके, शहर अध्यक्ष सुभाष मुसळे, बाबा राठोड हिंगोली यांनी मा. छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री यांना 1) आजच्या महागाईच्या निर्देशांकानुसार मार्जिनात वाढ करून मिळण्यात यावी 2) वितरणासाठी नवीन 5G जलद गतीचे नेटवर्क असलेले EPOS मशिने त्वरीत मिळावे. 3) दरमहा मोफत अन्नसुरक्षा अंतर्गत लाभार्थी शिधा पत्रिकाधारकांना वितरण झालेले धान्याचे मार्जिन त्वरीत मिळणेबाबत. 4) राज्यातील सर्व योजना अंतर्गत असलेले शिधापत्रिका धारकांना वितरणाकरीता धान्य उपलब्ध करून देण्याबाबत. 5) राज्यातील सध्या बंद असलेली केरोसीन परवानाधारकांचे पुर्नवसन होणे व त्यांना वितरणासाठी केरोसिन कोटा उपलब्ध करून देणे या मागण्यांचे रितसर निवेदन दिले.
मोर्चाला अनिल देशमुख, आमदार व माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री, आमदार जळगांवकर, आमदार अंतापुरकर, आमदार गजबे या आमदार महोदयांनी प्रत्यक्ष भेट देवून मोर्चाला संबोधित केले. त्याचप्रमाणे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कटरिया यांनी संदेश पाठवून मोर्थ्याला उत्साहित केले. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुनिल केदार यांनी काँग्रेस पक्षाचा मोर्चा असल्यामुळे फोनव्दारे आपले मनोगत व्यक्त केले. आमदार प्रविण दटके यांनी मोर्चाला समर्थन जाहिर केले. तसेच अनेक जिल्हाध्यक्षांनी व विविध पदाधिका-यांनी मोर्चाला संबोधित केले.
मोर्चा यशस्वी करण्याकरीता कार्याध्यक्ष संजय पाटील, नागपूर शहर अध्यक्ष सुभाष मुसळे, सचिव रितेश अग्रवाल, वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, प्रफुल्ल भुरा, राजेश कांबळे, मिलिंद सोनटक्के, दौलत कुंगवानी, शहाणे पाटील, सुनील जैस, प्रेम टिक्कस, रूपेश साखरकर, प्रकाश कांबळी, विक्की गुमगावकर, सतिश पांडे, नितिन घोराडकर, लक्ष्मीनारायण वासवानी, विक्की नागुलकर, मुन्ना मंगरूरकर, शंकर भोयर, रणवीर पटले, सतिश शेंडे, विजय मुसळे, सुनील खंडेलवाल, संजय उरकुडे, दिनेश यादव, अरूण पिलपिले, सुरेश मेहर, प्रविण उराडे, संदीप तेलमासरे, जय रामटेके, सुरेन्द्र कांबळे, प्रकाश टाकळे, मोनू वासवानी, प्रकाश मेश्राम, निखिल शाहू, राधेश्याम शाहू, विनित शर्मा, अक्षय शर्मा, विनोद जैस्वाल, प्रल्हाद शाहु, पुरुषोत्तम मोटवानी इत्यादींच्या अथक प्रयत्नांनी मोर्चा यशस्वी करण्यात आला.