नागपूर :- सार्वजनिक बांधकाम विभागाने हिवाळी अधिवेशनाकरिता मोठ्या संखेने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडाख्याचा थंडीत आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्याच्या आव्हानावर स्मार्ट उपाय शोधला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चौहान यांनी 160 खोल्यांचे गाळे येथे नव्याने लागू केलेल्या हिट पंप प्रणालीची पाहणी केली, या परिसरात अधिवेशनाकरिता आलेले सुमारे 3000 कर्मचारी वास्तव्यास आहे.
पारंपारिक गरम पाण्याच्या उपायांच्या मर्यादा ओळखून मंत्री रविंद्र चौहान यांनी ऊर्जा-कार्यक्षम पर्यायाच्या उपाय शोधण्याचे आदेश दिले होते. मागील ६० वर्षांपासून , डांबर गरम करण्याचे बॉयलरमधे डीझेलच्या सहाय्याने पाणी गरम करण्यात यायचे. ५००० लिटर पाणी गरम करायला सुमारे ३० लिटर डिझेलचा खर्च यायचा. तसेच पुढे बॉइलरमधून प्रत्येक स्नानगृह पर्यंत गरमपाणी वितरणासाठी मोठा मनुष्यबळ व कर्मचाऱ्यांचा वेळ खर्ची करुन सुद्धा वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना कडाक्याच्या थंडीत पुरेसे गरम पाणी उपलब्ध करणे कठीण जायचे. त्याकरिता विद्युत गीझरच्या पर्यायाचा विचार करण्यात आला. परंतु, यासाठी सुमारे 1000 कीलोवॅटचा प्रचंड विजेचा भार आला असता, ज्यासाठी ट्रान्सफॉर्मर व त्यासारख्या इतर पायाभूत सुविधांची गरज पडली असती.या करिता दुसरा पर्याय शोधनाच्या सूचना विद्युत (सा.बां.)विभागास मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या होत्या.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या दोन वर्षांत बरीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच आता ही नव्याने उभारण्यात आलेली भारतातील सर्वात मोठी हीट पंपची यंत्रणा यशस्वीरित्या बसवण्यात आली असून यशस्वीरीत्या काम करत आहे.गरम पाण्याच्या समस्येवर फक्त २५ KW विदुत भार वापरून हा एक कमी खर्चाचा आणि उत्तम उपाय असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले. मंत्री चौहान यांनी या जागेवर हिट पंपाच्या कार्यपद्धती व संचालनाची वैयक्तिकरित्या पाहणी करुन, वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचार्यांनी हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत नळाद्वारे थेट बाथरूम मधे गरम पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे मंत्री रवींद्र चौहान याचे जवळ आनंद व्यक्त केला .
मंत्र्यांच्या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्यासह अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, हेमंत पाटील कार्यकारी अभियंता, अभिजित कुचेवार आणि चंद्रशेखर गिरी उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण:
“सार्वजनिक बांधकाम विभाग याप्रकारे नवीन तंत्रज्ञानाचे अनेक उपक्रम राबवीत आहे, आता सार्वजनिक बांधकाम विभाग नवीनतम तंत्रज्ञान,अत्याधुनिक संगणक प्रणाली , सर्व सामान्य जनतेसाठी पॉट होल मोबाईल ऍप व अश्या अनेक बाबी सह राज्याच्या व देशाच्या सेवे साठी सज्ज आहे”.