– वृद्धाश्रमात केले फळ आणि बिस्कीट पॅकेट वाटप
रामटेक :-मनसे पक्षाचे युवा नेते तथा विधाथी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचा रामटेक मनसे तर्फे वृद्धाश्रमात फळ तथा बिस्कीट पॅकेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते तथा म.न.विधाथी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुन्डे यांच्या नेतृत्वात शहरातील वुध्दाश्रमात व रूग्णालयात आबाल वुध्दाना बिस्कीट पाकिटे व फळे वाटून अमित राज ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी पक्षाचे मनोज पालीवाल. बजरंग काटोले. विनायक महाजन, योगेश बोहरा , मनिष खडसे , रमेश उमरकर, कुंदन राऊत ग्रामपंचायत सदस्य अंबाझरी, मनोहर मरसकोले , अमोल मटकवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.