चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी संकल्प

– जगविख्यात तज्ञांसह घेतलेल्या आढावा बैठकीत वन अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

चंद्रपूर :- विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख शैलेंद्र टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वनविकास महामंडळाचे सिजिएम संजीवकुमार, प्रशांत झुरमुरे,  कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांना दाखविण्यात आले.

चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनी जवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प व्हावा असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा;अश्या प्रकल्पातून संशोधन व्हावे अशीदेखील अपेक्षा यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ना. मुनगंटीवार म्हणाले कि, सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहीती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा अशा सूचना यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Dec 7 , 2023
– मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ ध्वजदिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले एक महिन्याचे वेतन नागपूर :- ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत-जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली. रामगिरी येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!