नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बुधवार, दि. 6 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे. रात्री 9 वाजता कुटीर क्र. 9, रवी भवन येथे आगमन व मुक्काम असणार आहे.