– खाजगी नोंदणीकृत संस्थाकडुन वसतिगृह चालविण्यासाठी अर्ज आमंत्रित करणे
नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल योजना अंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थाकडून महाविद्यालयातील मुले,मुली साठीचे वसतिगृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. याकरिता अर्ज करणारी इच्छुक संस्था ही मुंबई विश्वस्त कायदा, 1950 किंवा संस्था नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच अश्या संस्थेचे किमान 3 वर्षे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह असलेल्या खाजगी नोंदणीकृत संस्थांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल.
संस्था निवडीसाठीचे पात्रता निकष, अटी व शर्ती या सारथी संस्थेच्या http/sarthimaharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 ही आहे. उशिराने प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज दाखल करण्याचा पत्ता उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी नागपूर (शहर) विभागीय कार्यालय (सारथी) नागपूर वनामती, नागपूर परिसर येथील इमारत (शहर व ग्रीष्म) व्ही.आय.पी. रोड धरमपेठ-440010
ई-मेल पत्ता divnagpursarthi@gmail.com