नागपूर :- जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय सभागृह दुसरा माळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय, नागपूर अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या कार्यालयातील प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी महालेखाकार कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात येणारा आहे. या पेन्शन अदालतीला महालेखाकार कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पेन्शन अदालतीमध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित निवृत्तीवेतनधारक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी नागपूर यांनी केले आहे.