“हम बदल जाये तो हालत बदल सकते है”….
पहिले सत्र : व्हाईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन
बारामती :- पत्रकारांच्या न्याय्य हक्काचे व्यासपीठ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याचे अधिवेशन आजपासून बारामती येथे सकाळी सुरूवात झाली. पहिल्या सत्रामध्ये व्हाईस ऑफ मीडियाची कामगिरी आगामी काळातील भूमिका, कार्य व जबाबदारी यावर चर्चा करण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी थंडीचे दिवस असतानाही राज्यभरातून आलेल्या पत्रकारांची पावले गदिमा सभागृहाकडे वळली. बाहेर नोंदणी विभागात हजेरी लावून पत्रकार बांधवांनी स्वागत भेटी साधल्या. पत्रकारांना संघटने मुळे उभारी मिळाली आहे. आगामी काळात चित्र बदलवण्यासाठी प्रत्येकाला काम अधिक सक्षम होऊन करावे लागेल अश्या भावना मांडत “हम बदल जाये तो हालत बदल सकते है” चा सूर व्यक्त झाला.
दरम्यान व्हाईस ऑफ मीडिया वेगवेगळ्या विंगच्या सुभेदारांनी कार्य आढावा देत भविष्याच्या दृष्टीने भूमिका देखील मांडल्या. मंचावर उर्दू विंग राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मो. हारून, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, रेडिओ विंग अमोल देशमुख, सोशल मिडिया विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष गगन महोत्रा, आरोग्य सेल चे भिमेश मुतुला, डिजिटल विंग चे जयपाल गायकवाड, साप्ताहिक विंग चे विनोद बोरे, पत्रकार हल्ला विरोधी फोरमचे संदीप महाजन, महिला विंग च्या सुकेशिनी नाईकवाडे, शिक्षण विभाग चेतन कात्रे यांचेसह अन्य प्रमुख उपस्थिती होती.
“हम बदल जाये तो हालत बदल सकते है”….
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश यासह अनेक ठिकाणी उर्दू विंग मजबूत केली आहे. व्हाईस ऑफ मीडियाने देशाला द्वेशमुक्त सकारात्मक पत्रकारीतेची शिकवणूक यांनी दिली आहे, असे उर्दू विंग राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मो. हारून यांनी सांगून
हम बदल जाये तो हालत बदल सकते है” च्या आशयाचा शेर सांगत प्रत्येकाकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
झोकून देऊन काम सुरू…
साप्ताहिक विंग चे विनोद बोरे यांनी व्हाईस ऑफ मीडिया ही सकारात्मकरित्या सर्वांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. राज्यभरात साप्ताहिक विंगचे जाळे निर्माण केले. कौटुंबिक मीलन सोहळे ठीक ठिकाणी घेतले. तसेच राज्य अधिवेशन छत्रपती संभाजी नगर मध्ये घेतल्याचे सांगून झोकून देऊन विंग काम करत असल्याचे म्हटले.
पत्रकार म्हणून ओळख मिळाली…
रेडिओ विंग चे अमोल देशमुख यांनी रेडिओ साठी काम करणाऱ्यांना श्रमिक पत्रकारांचा दर्जा मिळवून देण्यासाठी व्हाॅईस ऑफ मीडियाने पुढाकार घेतला असे सांगितले. संघटना वाढीच्या संदर्भात नियोजपूर्वक काम सुरू असल्याचे सांगितले.
महिला विंगच्या सुकेशनी नाईकवाडे यांनी महिला विंग सर्वप्रथम व्हाॅईस मीडियाने तयार केल्याचे अभिमानाने सांगून महिला पत्रकारांना यामुळे उभारी मिळाली आहे. यामुळे या क्षेत्रात महिलांची संख्या निश्चित वाढेल, असे सांगितले.
सेवा कार्याचा यज्ञ तेवत राहील….
आरोग्य विषयक समस्या मोठी आहे. तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या पत्रकारासाठी दुर्धर आजार जडला किंवा कुटुंबात एखाद्या सदस्याला आजाराने ग्रासले तर आपली विंग हककाने काम करते. विविध आजारासाठी निधी आपल्या कडे आहे. पत्रकारांनी आरोग्य विषयक जागृत राहावे असे कळकळीचे आवाहन सुध्दा आरोग्य विभाग चे भिमेश मुतुला यांनी केले. राज्यातील पत्रकारांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव पुढाकार राहील. आपले आरोग्य विषयक प्रश्न उपचारापूर्वीच सांगावे, जेणे करून मदत वेळेत पोचवता येईल.
गरजवंत सहकारी जास्त…
शिक्षण विभागाचे चेतन कात्रे यांनी आजवर राज्य भारतील १६०० पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आल्याचे संगितले. आर्थिक विवंचनेतून पत्रकार अडचणीत येतात. गरजवंत सहकारी जास्त आहेत, त्यांच्या समस्या शासनाच्या माध्यमातून लवकरच सोडविण्यात येतील.
“अनुभवले अन् पेटून उठलो”…
पत्रकार आणि त्यांच्यावर हल्ला या घटना अधून मधून घडतात. दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न राजकीय अथवा काही समाज कंटक करतात. माझ्यावर हल्ला झाला त्यामुळे पेटून उठलो.
पत्रकार आणि हल्ला नित्याचाच भाग आहे. पत्रकार हल्ला विरुद्ध कायद्यातील तरतुदी अपूर्ण आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच राज्यभरात पदाधिकारी नियुक्त केले जातील, असे पत्रकार हल्ला विरोधी फोरमचे संदीप महाजन यांनी सांगीतले.
सोशल मिडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष गगन महोत्रा यांनी सांगितले, की आज सोशल मीडिया प्रत्येकाची गरज बनली आहे. आपण स्वतःला ट्रेंड्स नुसार तयार ठेवले पाहिजे. युट्युबच्या माध्यमातून आर्थिक मिळकतीचा मार्ग मिळतो.
अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सर्वांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन मंगेश खाटीक यांनी केले.