संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात आज 5 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या ग्रा प सार्वत्रिक निवडणुकीतील नेरी ग्रा प चे प्रभाग क्र 1 चे उमेदवार योगेश झोड यांच्या निवडणूक मतदार संदर्भात मतदारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त वेळेत आवंढी शिवारजवळील बी एन पाटील ढाब्याजवळून वाहन क्र एम एच 40 बी डी 9633 ने शेताकडे जात असताना मागेहून येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ज्यामुळे उमेदवार बंधू चा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 6 वाजे दरम्यान घडली असून मृतकाचे नाव पंकज भोजराज झोड वय 34 वर्षे रा नेरी तालुका कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले असून यासंदर्भात फिर्यादी उमेश मुरलीधर झोड वय 34 वर्ष रा नेरी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 304(ए),279 सहकलम 177,34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आहे.
या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई जात असून अपघाती घटना नसून घात झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाच्या पाठीमागे वडील,भाऊ पत्नी तसेच फक्त एक महिन्याची मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.पण हे अज्ञात आरोपी कोण?याचा शोध घेणे अतिशय गरजेचे आहे