संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासनाने कित्येक वर्षांपासून रमाई घरकुल योजना,इंदिरा आवास योजना,शबरी घरकुल योजनांचे शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्याच पद्धतीने दिले जात असून वाढती महागाई,मजुरीचे दर लक्षात न घेता केवळ दीड लक्ष रुपये दिल्या जात आहे .परंतु हा निधी घरकुलाच्या पाया बनवण्यातच खर्च होत असल्याने घरकुल लाभार्थ्याला नाईलाजास्तव कर्ज काढून घर बांधावे लागते आणि बहुधा गरिबीमुळे त्याला कर्ज फेडता येत नाही अशी अवस्था घरकुल लाभार्थ्यांनी बोलून दाखविली आहे .त्यासाठी घरकुलाच्या निधीत पाच लाख रुपये करण्यात यावे अशी मागणी कांग्रेस नेता व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले आहे.
रमाई घरकुल योजना,इंदिरा आवास योजना,शबरी घरकुल योजना या सर्व योजनांचे अनुदान निधी महाराष्ट्र राज्य शासनाकडून मागील कित्येक वर्षांपासून एक लक्ष पन्नास हजार रुपये मिळत आहे.रेती, सिमेंट,विटा,लोहा व मजुरी याचे भाव कमी असताना या तुटपुंज्या अनुदानात लाभार्थी कसेबसे घर बांधत होते परंतु आता महागाईचा भडका कितीतरी पटीने वाढलेला असून गरीब लाभार्थ्याना दीड लाख रुपये अनुदानात घर बांधणे कठीण झालेले आहे.आजच्या काळात रेती ,सिमेंट, विटा,लोहा व मजुरीचे दर लाभार्थ्यांना परवडेनासे झाले आहे .त्यामुळे आजच्या महागाईच्या दृष्टीकोणातून विचार करता शासनाने घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच लाख रुपये अनुदान द्यावे जेनेकरून एक छोटंस घर गरीब लाभार्थ्यांना बांधता येईल.सदर मागणीची तात्काळ शासकीय व प्रशासकीय स्तरावरून दखल घेऊन पाठपुरावा करावा व पाच लाख रुपये निधी मंजूर करावा.जर सदर मागणी मान्य झाली नाही तर शासनाला व प्रशासनाला जागे करण्यासाठी कांग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी दिला आहे.