टेकाडी येथे पती-पत्नीच्या भांडणात पत्नीची चाकुने केली हत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी (को. ख.) महाजन नगर येथे सकाळी पती अमित भोयर व पत्नी दुलेश्वरी च्या भांडणात पती ने पत्नीचा गळ्यावर चाकु ने वार दुलेश्वरी ची निघृण हत्या केल्यावर कन्हान पोस्टे ला स्वत: जावुन आत्मसमर्पण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कन्हान परिसरात चांगलीच खळखब उडाली आहे.

प्राप्त माहिती नुसार टेकाडी (को.ख.) महाजन नगर येथील राहिवासी अमित नारायण भोयर वय २८ वर्ष याचा रनाळा कामठी येथील रामकृष्ण देवगडे यांची मुलगी दुलेश्वरी वय २५ वर्ष हिच्या सोबत (दि.५) मार्च २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्या नंतर दोघां मध्ये भांडणे होत असल्याने ती दुलेश्वरी माहेरीच जात येत होती. या दोघांना ९ महि न्याची कु. आराध्या नावाची एक छोटीशी मुलगी आहे. दुलेश्वरी ही नवरात्र च्या पहिलेच सासरी येवुन राहत होती. आज मंगळवार (दि.३१) ऑक्टोंबर ला सकाळी ९ ते ९.३० वाजता दरम्यान दोघेच घरी असताना पती अमित भोयर व पत्नी दुलेश्वरी यांचे भांडण झाल्याने पती अमित भोयर याने रोजच्या भांडणाला कंटाळुन घरात असलेल्या चाकुने स्वयंपाक घरात पत्नीचा गळ्यावर वार करून दुलेश्वरी ची निघृण हत्या केली. आणि स्वत: कन्हान पोस्टे ला जावुन आत्मसमर्पण केले. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरिक्ष क सार्थक नेहेते यांना मिळताच त्यांनी स्टाॅपसह घटना स्थळी पोहचुन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनाकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्या त आला. घटनेचे गंभीर्य लक्षात घेत नागपुर ग्रामिण अप्पर पोलिस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांनी घटना स्थळी भेट देऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले.

कन्हान पोलीसानी मृतक दुलेश्वरी चे वडिल फिर्यादी रामकृष्ण शालिकराम देवगडे वय ५६ वर्ष रा. सुपारे ले-ऑउट रनाळा, कामठी यांचे तक्रारी वरून आरोपी अमित नारायण भोयर वय २८ वर्ष यांचे विरू ध्द कलम ३०२, ४९८ अ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करित अटक करून घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन वरिष्ट पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटू आणि तायक्वांदोपटूंची छाप

Wed Nov 1 , 2023
– जलतरणमध्ये सहा आणि तायक्वांदोमध्ये चार पदकांची कमाई* – खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश* पणजी :- महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी सहाव्या दिवशी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य पदकांसह एकूण सहा पदकांची कमाई करीत छाप पाडली. यात वीरधवल आणि ऋजुता खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश हे वैशिष्ट्य ठरले. याचप्रमाणे तायक्वांदोपटूंनी महाराष्ट्राला दोन सुवर्णपदकांसह चार पदके मिळवून दिली. मृणाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!