संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका प्रसिद्ध वस्तीतील 25 वर्षीय अविवाहित तरुणीशी गुजरात राज्यातील रहिवासी आरोपी तरुणाने प्रेम संबंध गाठून लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर पीडित तरुणीने लग्न करण्याचा हट्ट केला असता आरोपी तरुणाने पीडित तरुणीला मारहाण करून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध केले व लग्नास थेट नकार दिला.यासंदर्भात पीडित फिर्यादी तरुणीने न्यायाची दाद मागण्याहेतु कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पाशवा पंकजभाई मेहता वय 29 वर्षे रा अहमदाबाद गुजरात विरुद्ध भादवी कलम 376,(2)एन 323,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.