नागपूर :- अजनी पोलीस स्टेशन मागील रोडवर विश्वकर्मा नगर येथे मागील 20 दिवसापासून खुला गडर असून त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वसाहतीत डेंगू पसरत आहे, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.