नागपूर :- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा सकल मराठा समाज व मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सक्करदरा चौकात मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता.अंबर, जि. जालना येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजबांधव व आंदोलकांवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून केलेल्या अमानुष लाठीहल्याचा मराठा विद्या प्रसारक समाजाचे वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
लाठीहल्ला हा क्रूरपणा असून पोलिसांचे हे कृत्य निंदनीय आहे. या गंभीर घटनेची राज्य शासने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या स्थानिक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावे.अन्यथा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास याला राज्य सरकार जबाबदार राहील. झालेल्या या संपूर्ण घटनेचा सकल मराठा समाज व मराठा विद्या प्रसारक समाज,नागपूर यांचे सह शहरातील समाजबांधवांचे वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांचे नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला नागपूर शहरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.