संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार पुण्यानुमोदन व धम्मदेसना
कामठी :- स्मूर्तीशेष महादानदायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या चतुर्थ स्मूर्ति दिनानिमित्त शनिवार दिनांक 2 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ व धम्मदेसना चे आयोजन करण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की ,जपान येथील महाउपासिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या धम्मदानातुन कामठी शहरात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आले.ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती ,मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचे केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जपान येथील मॅडम नोरिको ओगावा व भारतातील ऍड सुलेखा कुंभारे यांच्या जपान भारत मैत्रीचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखल्या जात आहे.नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी सोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बौद्ध टुरिस्ट सर्किट मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे ही फार मोठी उपलब्धी असल्याचे मत ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.
2सप्टेंबर 2019 वर्षी जपान येथे मॅडम नोरिको ओगावा यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्याप्रसंगी मॅडम नोरिको ओगावा यांच्या अंत्यविधी करिता जपान येथे ऍड सुलेखाताई कुंभारे उपस्थित होत्या .शनिवार 2 सप्टेंबर 2023 रोजी मॅडम नोरिको ओगावा यांच्या चतुर्थ स्मूर्ति दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्रांण पाठ,धम्मदेसना तसेच पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला पूज्य भदंत महापंत महास्थवीर,रामदेगी-चंद्रपूर येथील पूज्य भदंत ज्ञानज्योति महाथेरो,दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य पूज्य भदंत नागदीपंकर स्थविर ,पूज्य भदंत प्रज्ञाज्योति थेरो, पूज्य भदंत डॉ मेत्तानंद थेरो,पूज्य भदंत बोधानंद,पूज्य भदंत ज्ञानबोधी स्थविर,पूज्य भदंत डॉ सिलवन्स स्थविर,पूज्य भदंत ज्योतिबोधी,पूज्य भदंत नंदिता,पूज्य भदंत सेबीदा,पूज्य भदंत इंद्रज्योति,पूज्य भदंत केशी असलामा,पूज्य भदंत नंदमीत्र, पूज्य भदंत सुगता,पूज्य भदंत अगधम्मा,पूज्य भदंत कवीविंदा व पूज्य भिकखु संघाच्या उपस्थितीत महापरित्रांण पाठ व धम्मदेसनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते पुज्यनिय भिक्खू संघाला चिवरदान व भोजनदान देण्यात येईल.या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित राहून महापरित्त-धम्मदेसनेचा लाभ घेऊन कुशलकामात पुण्य संचित करण्याची विनंती ऍड सुलेखा कुंभारे यांनी केली आहे.
वरील कार्यक्रमाचे आयोजन ओगावा सोसायटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, हरदास हायस्कुल,हरदास प्रायमरी स्कुल,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, दासासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ओगावा इंटरप्रायझेस प्रा ली यांच्या द्वारे करण्यात आले आहे.