नागपूर :- थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा उपायुक्त विजया बनकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैल चित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राजेश गजभिये, राजेश लिहितकार, प्रमोद हिवसे, मुकेश मोरे, कैलास लांडे व इतर उपस्थित होते.