खाण ब्लास्टिंग च्या धक्क्याने घर कोसळल्याने वडीलासह पाच वर्षोय बालिकेचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कांद्री येथे डब्लूसीएल खाणीच्या ब्लास्टिंग च्या धक्क्याने कांद्री येथील वॉर्ड क्र 1 येथे झोपडी कोसळल्याने झोपडीत झोपलेल्या बापलेकीचा जागीच मृत्यु झाल्याची हृदयविदारक घटना आज दुपारी 12.45 वाजता घडली असून मृतक वडिलाचे नाव कमलेश गजानन पोटेकर वय 34 वर्षे तसेच मृतक पाच वर्षोय मुलीचे नाव याजवी कमलेश पोटेकर रा कांद्री असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक कमलेश पोटेकर हा नावी म्हणून कार्यरत असून आज सोमवार सुटीचा दिवस असल्याने घरी विश्रांती घेत होता तर तर पाच वर्षोय बालिका सुद्धा विश्रांती घेत होती तर इतर घरमंडळी घराबाहेर होते.दरम्यान आज दुपारी साडे बारा दरम्यान अचानक झालेल्या खाणीच्या ब्लास्टिंग मुळे सदर झोपडी पडल्याने या झोपडीत झोपी असलेल्या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत दोन्ही मृतदेहाच्या पार्थिवावर कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता काढण्याचा निर्णय रद्दबातल करणार- नामदार आठवले

Mon Aug 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर आणि चंद्रपूर विद्यापीठातील तीन समाजकार्य महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याबाबत समाज कल्याण आयुक्तांनी काढलेला आदेश रद्दबातल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून सदर आदेश रद्द करू असा विश्वास नामदार आठवले यांनी बैठकीत व्यक्त केला. असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स अँड मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र  मेश्राम यांच्या नेतृत्वात समाजकार्य महाविद्यालये चालविणाऱ्या संस्था व कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधीं यांच्या समवेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!