संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील विशेष दिवस कार्यक्रम समिति व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मदर टेरेसा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतरत्न मदर टेरेसा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करीत भारतरत्न मदर टेरेसा यांच्या जीवन व मिशनरीज ऑफ चॅरिटी अंतर्गत मदर टेरेसा यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी मदर टेरेसा यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन मानवतेच्या मार्गावर चालण्याचे आव्हान उपस्थित लोकांना केले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती, डॉ. रेनू तिवारी, आय. क्यू.ए.सी. संयोजक डॉ. प्रशांत धोंगले, सी.डी.सी. सदस्य डॉ. जयंत रामटेके, डॉ. इफ़्तेख़ार हुसैन, डॉ. नितिन मेश्राम, डॉ. संजीव शिरपुरकर, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. सतिश डूडूरे, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. अज़हर अबरार, डॉ. दिपक भावसागर, डॉ. तुषार चौधरी, विनोद शेंडे, डॉ. अलोक रॉय, डॉ. रतिराम चौधरी, डॉ. राजेश पराते, डॉ. किशोर ढोले, डॉ. सुदीप मोंडल, डॉ. महेश जोगी, डॉ. विकास कामडी, डॉ. जयश्री ठवरे, डॉ. शालिनी चाहंदे, डॉ. रश्मी चाजक. डॉ. समृद्धि टापरे, ग्रंथपाल शिल्पा हिरेखन आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक शुभम विश्वकर्मा संचालन प्रज्ज्वल सोलंकी तर धन्यवाद नेहल हाड़के यांनी मानले.