मौदा :- दिनांक ०९/०७/२०२३ चे १६.३० वा. ते १९.०० वा. चे सुमारास पो.स्टे. मौदात फिर्यादी वय १५ वर्ष रा. चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर ह. मु. दहेगाव भोवरी ता. मौदा जि. नागपुर ही घरी हजर होती वडील हे कामानिमीत्य बाहेरगावी गेले होते ते संध्याकाळी ०९.०७.२०२३ घरी परत आले त्यांनी पत्नीला विचारले की मुलगी कोठे गेली तीने सांगीतले की मी मुलीला ०४.३० वा. दरम्यान बघीतले होते त्यानंतर ती मला दिसली नाही. गावात नातेवाइकात मुलीचा शोध घेतला मुलगी मिळून न आल्याने मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार चांदवार हे करीत आहे.