नागपूर :- पो. ठाणे बेलतरोडी हद्दीत, लॉट. नं. ५२, किष्णकृपा ले-आउट, पांजरी फार्म, नागपुर येथे राहणारे फिर्यादी रविरोशन भोला कुर्वे वय ३४ हे त्यांचे घराला कुलूप लावून परिवारासह बाहेरगावी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचे किचनरूमचे दार कोणत्यातरी लोखंडी वस्तुचा उपयोग करून उपटुन घरात प्रवेश करून देवघरातील प्लायवुडचे आलमारीतून सोने, चांदीचे दागीने असा एकुण किंमती अं. ४,३३,५००/ या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे बेलतरोडी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४४५७ ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद होता. वरील गुन्हयाचे समातर तपासात गुन्हे शाखा युनिट १ ने अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती वरून सापळा रचुन आरोपी १) निलेश सुनवा हरदिया, वय २४ वर्ष, रा. खापरी पुर्नवसन वस्ती, सोनेगांव, २) कृष्णा तिवदुजी पंचेश्वर, वय २८ वर्ष रा. अमीक नगर, परसोडी, वर्धा रोड, नागपूर यांना ताब्यात घेवून त्याचा सखोल विचारपूस केली असता आरोपांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींचे ताब्यातून नगदी २,८०,०००/- रु. एक सोन्याची अंगठी, चांदीची चैन व मोपेड गाडी असा एकूण ३,४४,३८९/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव बेलतरोडी पोलीसांची ताब्यात दिलेले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. अनिल ताकसांडे, सपोनि राजेन्द्र गुप्ता, पाउपनि दिपक ठाकरे, पोहवा बबन राउत, नुतनसिंग छाडी, नितीन वासनिक, नापोअ सुशांत सोळंके, रितेश तुमडाम व सोनु भावरे, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, सुनीत गुजर, शरद चांभारे, अजय शुक्ला व अमर रोठे, चंद्रशेखर भारती, योगेश सेलुकर व नितीन बोपुलकर यांनी केली आहे.