रामटेक :- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते अविनाश जाधव व संदीप देशपांडे यांनी नुकतीच २० व २१ जून २०२३ ला रविभवन नागपूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यात सेवक सिताराम बेलसरे यांची मनसे रामटेक तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
सेवक बेलसरे यांच्या नियुक्तीने रामटेक तालुक्यातील आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात असून रामटेक तालुक्यात मनसे पक्ष वाढीचे कार्य यापुढे जोमाने होण्याची दाट शक्यता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. यावेळी उपस्थितांमध्ये मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले, माजी मनसे तालुकाध्यक्ष अनिल मुलमुले, रतन वासनिक , जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे, मनोहर भगत , मुन्ना ओझा , प्रफुल पुसदेकर , मयूर तळेगावकर , अमित बहादुले , राकेश चौरे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी सेवक बेलसरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.